Skip to main content
प्रेरणा महाविद्यालयात "स्वच्छता ही सेवा" अभियान पर उपक्रम.गडचांदूर- ........ प्रतिनिधी, मनोज गोरे........दि.25 सप्टेंबर केंद्र सरकारच्या युवा मंत्रालयाच्या वतीने केलेल्या आवाहनानुसार १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदूर येथे करण्यात आले. 25 सप्टेंबरला मा. अरविंद मुसने सर यांच्या हस्ते उपस्थित स्वयंसेवकांना स्वच्छतेवर शपथ देण्यात आली. द्वितीय सत्रात स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. नामदेवराव ठेंगणे सर व सामाजिक कार्यकर्ते बालाजीभाऊ पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य नानेश्र्वर धोटे यांच्या नेतृत्त्वात "मेरा युवा भारत पोर्टल व स्वच्छता ही सेवा" या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम घेण्यातआले . स्वच्छता आणि युवक या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथी म्हणून मा. रमेश राठोड सर उपस्थित होते. व्याख्यानात माय भारत पोर्टलचे महत्व व विद्यार्थ्यांना पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन मा. रमेश राठोड सर यांनी केले. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य नानेश्वर धोटे यांनी केले. यानंतर स्वच्छता ही सेवा योजने अंतर्गत उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी शहरातील मुख्य मार्ग,बस स्थानक, बाजार पेठ इत्यादी ठिकाणी स्वयंसेवकाने हातात झाडू घेऊन रस्ते स्वच्छ केले.शिवाय मोठ्या प्रमाणात असलेला प्लास्टिक कचरा, प्लास्टिक बॉटलचे संकलन करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली.कार्यक्रमाचे आयोजन प्रा. एकता गेडाम, प्रा. डॉ .प्रशांत सरकार, प्रा. पल्लवी एकरे यांनी केले. या उपक्रमासाठी गटप्रमुख वैभव ताजने, मुलींची गटप्रमुख साक्षी डाखरे आदींनी परिश्रम घेतले. स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत शहरातील विविध ठिकाणांवर उपस्थित असलेल्या नागरिकांना महाविद्यालयीन विध्यार्थ्यानी स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितले महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306....9529713410
Popular posts from this blog