Skip to main content
*बेकिंग.........माय भुमि न्युज,जिवती येथे कोयापूनेम गोंडी धर्म भाषा कार्यशाळा*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी:- कृष्णा चव्हाण .जिवती - भारतातील मध्यप्रदेश, छत्तीसगढ, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, तेलंगाना अशा अनेक राज्यात गोंडी भाषा प्रामुख्याने बोलली जाते. या भाषेला भारतीय संविधानाच्या संविधानिक दर्जा बहाल करावा व येणाऱ्या जनगणनेत गोंडी धर्म संविधानाच्या सविधनिक दर्जा बहाल करुन धर्म कालम मध्ये स्वतंत्र 'गोंडी धर्म' कालम तयार करण्यात यावा व महाराष्ट्राचा गोंडी भाषेला मान्यता मिळण्यासाठी आणि आगामी जनगणनेमध्ये 8 व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात यावा,याकरिता जिवती तालुक्यातील गोंडवाना कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जिवती येथे कोयापुनेम गोंडी धर्म भाषा कार्यशाळा (शिबिर) आयोजित करण्यात आले होते.याकार्यक्रमाचे अध्यक्ष गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गजानन पाटील जुमनाके तर प्रमूख मार्गदर्शक दौलत कोरांगे गोंगपा प्रदेशाध्यक्ष तेलंगणा, आरजू सिडाम, उपाध्यक्ष राष्ट्रीय गोंडवाना महासभा, शामराव उईके गोंडी भाषा प्रदेशाध्यक्ष, किसनराव कोटनाके अध्यक्ष, राय सेंटर तेलगाना, बापूराव बावणे आदिलाबाद होते. तसेच यावेळी भिमराव मेश्राम माजी सभापती, प्रा.लक्ष्मण मंगाम अध्यक्ष, मूळनिवासी एकता संघर्ष समिती,हनुमंत कुमरे माजी सरपंच, मंगुजी मडावी जिवती गोंडी गायक, शामराव सलाम सामाजिक कार्यकर्ते, धनराज पंधरे राय सेंटर सोनापुर, इजी. बालाजी मडावी , ईसतराव आत्राम कोलामी गायक, भिमराव कोडापे, बापूराव सलाम मोकाशी, आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कार्यशाळेचे आयोजक प्रा. लक्ष्मण मंगाम तर आभार बालाजी मडावी यानी मानले महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856
Popular posts from this blog