*प्रांजळ, मेहनती आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व : प्राचार्य डॉ.संभाजी वारकड सर*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.राजुरा -जीवनाच्या प्रवासात अनेक व्यक्तींचा सहवास लाभतो परंतु काही व्यक्तिमत्व असे असतात की ज्यांच्या विलक्षण कार्यकर्तृत्वाने आपण प्रभावित होतो. सतत काम करण्याची हातोटी , प्रचंड परिश्रम घेण्याची प्रवृत्ती आणि कशाही स्थितीत नाउमेद न होता गड सर करण्याची जिद्य या सर्व गोष्टी ज्यांच्यात अंतर्भूत आहेत असे व्यक्तिमत्व म्हणजेच प्राचार्य डॉ. संभाजी वारकड सर होय.सरांचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रेमळ, मनमिळावू ,समंजस, निरंहकारी, कर्तव्यदक्ष आणि दूरदृष्टीचे आहे. सरांचे बालपण जिवती सारख्या अतिदुर्गम भागात गेले. घरातील वारकरी संप्रदायाचा प्रभाव त्यांच्यावर पडला असल्यामुळे सर्व मंगल मांगल्याचीच भावना जोपासत सर्वतोपरी गरजूंना मदत करण्यासाठी ते तत्पर असतात. सांप्रदायिकतेमुळे नैतिक आचरण शुद्ध आहे. प्रेमळ, दिलखुलास, प्रभावी रुबाबदार असे राजबिंडे व्यक्तिमत्व सरांना लाभले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे जन्म झाल्यानंतर, दमपुर मोहदा येथील आश्रम शाळेतून सुरू झालेला शैक्षणिक प्रवास, आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा ते उदयगिरी महाविद्यालय उदगीर असा होत शैक्षणिक आलेख वाढतच राहिला. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात कायम प्राविण्य प्राप्त केले आहे. इंग्रजी सारख्या विषयात एम.ए. अभ्यासक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून मेरिट लिस्ट येण्याचा मान त्यांनी अत्यंत कठोर परिश्रम घेऊन मिळविला त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोग द्वारा आयोजित इंग्रजी विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण केली त्यानंतर तामिळनाडू राज्यातून इंग्रजीमध्ये एम फिल व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून इंग्रजी विषयात पीएचडी ही आचार्य पदवी मिळविले.सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे नोकरीवर रुजू झाले. सतत कार्यमग्न असणारे व्यासंगी ,परिश्रमी बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या प्रा संभाजी वारकड यांनी सरदार पटेल महाविद्यालयांमध्ये अल्पावधीतच वेगळा ठसा उमटविला. दहा वर्ष सातत्यपूर्ण अध्यापनाने आणि प्रभावी संभाषण कौशल्यामुळे ते कायम विद्यार्थी प्रिय व कर्मचारीप्रिय राहिले. अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची प्रतिमा आहे. विविध पुरोगामी संघटनात सक्रिय काम करीत समाजातील गरीब, उपेक्षित, होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात सर नेहमी अग्रेसर असतात . देवराव भोंगळे, नामदेव देवकते ,प्राचार्य पांडुरंग सावंत यासारखे अनेक विद्यार्थी सरांचे गौरवाने आजही नाव घेतात. कोणाचाही द्वेष, मत्सर न करता हेवा , असूया न ठेवता सहानुभवाने सौजन्यपूर्ण व्यवहार करणारे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणजेच प्राचार्य संभाजी वारकड सर होय.प्रारंभी शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय, सरदार पटेल महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक ,त्यानंतर आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित प्रभाकरराव मामुलकर कला महाविद्यालय कोरपना येथे प्राचार्य तिथून राजुरा येथील श्री शिवाजी महाविद्यालयात प्राचार्य, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली स्थापनेनंतर इंग्रजी भाषा अभ्यास मंडळ, त्यानंतर विद्यापीठाच्या सिनेटवर निवडून आले त्यानंतर अकॅडमी कौन्सिल, विज्ञान व तंत्रज्ञान भाषा अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, स्थायी समिती सदस्य, गोंडवाना विद्यापीठ प्राचार्य फोरमचे सहसचिव, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य तसेच कै. बापूजी पाटील मामुलकर स्मृति प्रतिष्ठानचे संचालक अशा विविध प्राधिकरणावर प्रभावी आणि यशस्वीपणे त्यांनी कार्य केले आहे. इंग्रजी विषयात अकरा पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्य पदवी प्राप्त केली आहे व सध्या सहा विद्यार्थी आचार्य पदवी प्रबंधाचे कार्य त्यांच्या मार्गदर्शनात करीत आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध शोधनिबंध व डझनभर पुस्तके त्यांनी प्रकाशित केलेली तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यशाळा सेमिनार व परिषदा त्यांनी कोरपना व राजुरा येथील महाविद्यालयात यशस्वीपणे आयोजित करून महाविद्यालयाचा संपर्क जगभरातील बऱ्याच देशाशी स्थापन केलेला आहे.ग्रामीण भागातल्या होतकरू विद्यार्थ्यांना विविध शासकीय नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होऊ शकतील .त्यासाठी कोणते परिश्रम घ्यायला हवे याविषयी सर सदोदित प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन करतात. त्याचेच फलित म्हणजे माणिकगड पहाडावरील अतिदुर्गम जिवती तालुक्यातील गरीब ,होतकरू विद्यार्थ्याकरिता त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिवती तालुका सर्व व्यापी सेवा फाउंडेशनची निर्मिती झाली .त्यातून चंद्रपुरात तुकुम येथे मोफत अभ्यासिका चालविली त्यातून चार महिन्यात तब्बल २४ विद्यार्थी विविध शासकीय सेवेत लागले. अशा सामाजिक कार्यात सर नेहमी पुढाकार घेतात.राजुरा येथे शिवाजी महाविद्यालयात विविध कोर्सेस आणून जी प्रगती केली आहे त्यात सरांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.. राजुरा बस स्थानकासमोर वाचनालय सुरू करण्यात सरांनी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत.सामाजिक ,सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळ्या अंगाने सर नेहमी कार्य करतात. स्वतः प्रतिकुलतेवर मात करीत उच्च शिक्षण घेऊन ते नोकरीवर रुजू झाले .किंबहुना महात्मा फुले- सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पत्नीला उच्च शिक्षण घेण्यास प्रवृत्त करून यशस्वी अध्यापिका बनविले. होतकरू विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचा ध्यास कायम मनी बाळगत या उपजत झऱ्यांना मोकळे करुन विकसित करता येईल, यासाठीचे सरांचे प्रयत्न अहोरात्र सुरू असतात.प्रयत्नपूर्वक स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून आपल्यासारख्या धडपडणाऱ्या अनेकांना विविध संधी उपलब्ध कशा होतील व त्यांनाही स्वावलंबी कसे होता येईल, या ध्यासाने प्रयत्नरत असतात. जिवती तालुक्याकरिता ते आदर्श असे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. तालुक्यातील. प्रा .राजकुमार मुसणे , डॉ.माधव कांडनगिरे, प्रा.ज्ञानेश्वर गिरमाजी , प्रा.तुकाराम गिरमाजी, प्रा.महेश देवकते ,प्रा. चेतना चव्हाण, रमेश राठोड असे कितीतरी व्यक्ती प्राचार्य संभाजी वारकड यांना प्रेरणास्थानी मानतात.जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात सरांचा सल्ला अवश्य घेतात.आज डॉ . वारकड सर वयाचे पन्नास वर्षे पूर्ण करीत आहेत. आजही सतत बारा तास एका जागी बसून कार्य करण्याची त्यांची क्षमता वाखाण्ण्यासारखी आहे. अर्थातच तरुणांनाही लाजवेल असे उत्साही व सदाबहार व्यक्तिमत्व त्यांचे आहे. प्रा. अंजली वारकड, या अर्धांगिनी ,आदित्य व श्रीनिवास हे दोन अपत्य आणि इतर बराचसा गोतावळा आहे.सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या व पुढील भावी उज्वल आयुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!प्रा. डॉ. राजकुमार मुसणे... महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856

Popular posts from this blog

ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर खामगाव तालुक्यातील लोणी गुरव येथील घटना..मुलाने केला वडिलांचा खून असे पोलिसांच्या तपासातूनआले समोर..जिल्हा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात खूनाचे सत्र थांबायचे नाव घेत नाही खामगाव तसेच..खामगाव तालुक्यातील लोणी गुरु येथील घटना मुलानेच बापाला संपविले काळीमा फासणारी घटना जन्मदात्या आई-वडिलांचा खून करायला भीत नाही म्हटलं तर बाकी या जगात काहीच सत्य नाही एवढं मात्र खरं खामगाव तालुक्यातील लोणी गुरव येथे 30 एप्रिल च्या सकाळी ही घटना उघड झाली गौरव घेवराळे यांच्या अंगावर असलेल्या भावावरून प्रथमदर्शी निर्गुण खून करण्यात आल्याचे समोर आले पोटच्या मुलाने जोडलांचा खून केल्याचे पुरुषांच्या तपासात समोर आले आहे खामगाव तालुक्यातील मूळ बोताकाजी येथील रहिवासी गौरव हिवराळे गेल्या काही वर्षापासून त्यांच्या सासरी लोणीगुरू येथे राहत होते याच दरम्यान आज सकाळी त्याचा मृत्यू देव होता का जिथे त्यांच्या घरात आढळला या घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणात तिघांची विचारपूस केल्याची माहिती समोर आली मुलानेच बापाचा खून केला असे समोर आले आहे महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक.... गजानन धंदरे बुलढाणा मोबाईल नंबर 9850835306👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾धन्यवाद

ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर 👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾खामगाव तालुक्यातील हिवरखेड या गावांमध्ये दोन गटात हाणामारी....फिर्यादी तर्फे... पोहे का विठ्ठल चव्हाण वन नंबर 1240 पोलीस स्टेशन तालुका खामगाव कलमी अपराध क्रमांक 82/2025 कलम 109, 118 (१) 132, 121, (१) 223, 189 (२) 192 (२) 191 (३) 190, 352 351 (२)(३) भारतीय न्यायदा प्रमाणे २०२३ कलम 135 प्रमाणे गुन्हे दाखल आरोपी , (१)निवृत्ती परसराम राऊत (२) सागर मनोहर फुंडकर (३) प्रफुल वैजनाथ पारस्कर (४) रितेश ज्ञानदेव कडाळे (५) राजू पांडुरंग बावणे (६) ज्ञानेश्वर रामकृष्ण बोंबटकार (७) समाधान परसराम महाले (८) अमोल महादेव चोपडे (९) विशाल गोटीराम पवार (१०) पांडुरंग विठ्ठल बाराते (११) विश्वनाथ महादेव भटकर (१२) संजय पंढरी ठाकरे (१३) सतीश वासुदेव खंडारे (१४) मुकिंदा रमेश फुंडकर (१५) राजेश गंगाधर भारसाकडे (१६) कृती श्रीकृष्ण धनोकार (१७) महेंद्र किसन शिंदे (१८) सार्थक रमेश गवई (१९) आश्विन अरुण वाकोडे (२०) गोपाल उत्तम मोरे (२१) सिद्धार्थ दादाराव गवई (२२) निलेश बाबुराव गव ई(२३) साहेबराव भीमराव गव ई(२४) जोगेंद्र यशवंत वाकोडे (२५) मोहन समाधान वानखेडे (२६) विकास प्रकाश गवई (२८) भीमराव त्रंबक गवई (२९) संघपाल संभाजी गवई (३०) विजय कैलास आराख (३१) मुकिंदा यशवंत गवई (३२) रविराज भगवान आराख (३३) राजू बाबुराव गवई (३४) निलेश गवई या सर्व आरोपीला 335 मपोका कलम गुन्हे दाखल करण्यात आले व आरोपी जेरबंद करण्यात आले हिवरखेड गावातील बौद्ध समाजाची लोकांनी दिनांक 13 4 2025 रोजी रात्री इलेक्ट्रिक लाईट बंद करून इलेक्ट्रिक पोल वर निळे झेंडे लावले त्यानंतर दिनांक 14 /4 /2014 रोजी हिंदू समाज लोकांनी सकाळी आपले दुकाने सर्व बंद ठेवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक सुरू असताना अचानक इलेक्ट्रॉनिक लाईट बंद झाले तसेच गावातील हिंदू समाजाच्या लोकांनी सालावादाप्रमाणे सहभाग न घेतल्याने दोन्ही समाजातील लोकांमध्ये नाराजी निर्माण झालेली होती गुण्याच्या नमूद घटना तारीख वेळी व ठिकाणी निर्माण करून हिंदू कुणबी व बौद्ध समाजातील लोकांनी लाट्या-काठ्या लोखंडी पाईप कुराळ दगड विटा असे प्राण घातक शस्त्र घेऊन एकमेकांच्या समोरासमोर येऊन एकमेकांना मादरचोत हरामखोर अशा शिव्या गाळा केल्या व एकमेकांना दगड विटा फेकून मारत होते जितेंद्र किसन शिंदे या जीवाने ठार मारण्याच्या उद्देशाने सागर मनोहर फुंडकर यांनी दगड मारून जखमी केले तसेच महेंद्र किसन शिंदे यांनी गौरव फुंडकर यास ठार मारण्याचे उद्देशाने दगड मारला त्यामुळे त्यांचे फोटोवर मुक्का मार लागला त्यावेळी दगडफेकी मध्ये जितेंद्र किसन शिंदे सुरेश सारंग सावंग पांडुरंग बाराते गौरव फुंडकर असे जखमी झाले पोलीस स्टॉप असे दोन्ही समाजाचे लोकांना सोडण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनी पिराजी व पोलीस स्टफला लोटा पाठ करून धक्काबुक्की करून फिर्यादी पोलीस स्टफ करीत असलेल्या शासकीय कर्तव्य मध्ये अडथळा निर्माण केला जिल्हाधिकारी साहेब यांच्या जमाबंदी आदेशाचे उल्लगन झाल्याप्रमाणे रिपोर्ट वरून अपराध दाखल करण्यात आला अधिकारी... श्री विश्व पानसरे माननीय पोलीस अधीक्षक बुलढाणा, श्री श्रेणिक लोढा माननीय अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री बी बी महामुनी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा, श्री प्रदीप पाटील उपविभागी पोलीस अधिकारी मेहकर, प्रभाग खामगाव श्री सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी बुलढाणा ठाणेदार कैलास चौधरी... यांनी यावेळी चोको बंदोबस लावला कर्फ्यू नियंत्रण ठेवला...महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्यांसाठी संपर्क करा मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾धन्यवाद

ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर.... सफाई कामगार कर्मचाऱ्यांच्या रास्त न्याय मागण्या... खामगाव तालुक्यातील शिवराज्य सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने खामगाव नगर परिषदेतील सफाई कामगार कर्मचाऱ्यांच्या राष्ट्र न्याय मागण्या..(१) खामगाव शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार नवीन 400 सफाई कामगार भरतीसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवावे जर पाठवलेले असतील तर प्रस्तावाची नक्कल साक्षात प्रत संघटनेला द्यावी (२) सफाई कामगारांना कचरा गाडी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावे (३) शासन आदेशानुसार खामगाव शहरातील सर्व सफाई कामगारांचे राहते घरी नमुना ड आठ अ नावे करण्यात यावे प्रत्येक सफाई कामगारांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून 30 बाय 50 चे प्लॉट वाटप करण्यात यावे (४) सफाई कामगार पुरुष महिला यांना प्रत्येकी दोन ड्रेस चप्पल गम बूट देण्यात यावे (५) सर्व सफाई कामगारांना रक्षाबंधनापूर्वी पगार व पेन्शन देणे द्यावे तसेच घंटागाडी कामगारांना पगार देण्याचे आदेश कंत्रा दारास घ्यावे (६) सफाई कामगारांना साफसफाईची कामासाठी लागणारे सर्व साहित्य त्वरित देणे द्यावी (७) सेवा नियुक्त मयत सफाई कामगारांचे वारसांना नामनिर्देशातील व्यक्तींना शासन निर्णय प्रमाणे वारसा हक्काचे त्वरित सेवेत समावून करण्यात यावे (८) शासन नियमाप्रमाणे सूची सेवा नियुक्ती मागण्या आला सफाई कामगारांना वेदकीय प्रभागाची अट न घालता सोयीच्या सेवा नियुक्ती कालावधीत नियमाप्रमाणे देण्यात यावी (९) सर्व सफाई कामगारांना श्री गोगानवमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे अग्रेस रक्कम दहा हजारा देण्यात यावी(१०) शासन आदेशानुसार सफाई कामगारांना सर्व शासकीय सुट्ट्या विना नीलम न लागू करण्यात याव्या शासकीय सुट्ट्या त्या दिवशी कामे केलेल्या दिवसांचा मोबदल्याची शासन निर्णय निघल्यापासूनची थकीत रक्कम त्वरित अदा करणे द्यावी (११) नगरपरिषद खामगाव तर्फे कृषी उत्पन्न लॉन्स मध्ये मेतर समाजाचे इष्टदेव श्री गोगाजी महाराजांची गुगामेंडी पासून जन्मोत्सव निमित्त जागा उपलब्ध करून देऊन मंदिर बांधून देण्यात यावे याकरिता निवेदन सादर याच अनुषंगाने शिवराज्य सफाई कर्मचारी सेना संघटनेच्या वतीने शिवराज्य सफाई संघटनेचे शहर अध्यक्ष गणेश कबीरदासजी गहलोत (राजपूत) तसेच शिवराज्य सफाई कर्मचारी संघटनेचे सचिव.... शंभू नंदलालजी शर्मा यांनी यावेळी आपले पदाधिकारी घेऊन व पदाधिकाऱ्यांच्या विश्वास टाकून सदर सूचना सांगून या संघटनेच्या वतीने माननीय मुख्य अधिकारी साहेब नगर परिषद खामगाव यांना देण्यात आले प्रतिलिपी...मा मुख्यमंत्री महाराष्ट्र मंत्रालय मुंबई. माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार श्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, माननीय प्रधान सचिव नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई, माननीय आकाश दादा फुंडकर कामगार मंत्री तथा आमदार खामगाव मतदार संघ महाराष्ट्र राज्य मुंबई, माननीय संचालक नगर विकास विभाग संचालक मुंबई, माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग मंत्रालय मुंबई 32, माननीय विभागीय आयुक्त तथा नगरपालिका प्रशासन प्रादेशिक विभाग अमरावती, माननीय जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा, माननीय उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी खामगाव, माननीय संपादक माय भूमी न्यूज नेटवर्क खामगाव बुलढाणा.... महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा... मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306