Skip to main content
बेकिंग......... माय भुमि न्युज. *रिपाई आंबेडकर पक्षातर्फे जळगाव जामोद मतदार संघामध्ये विधानसभा उमेदवार म्हणून पँथर प्रफुल तायडे यांना उमेदवारी*....... **29 ऑक्टोबरला भरणार उमेदवारी अर्ज हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याची केली मतदार बंधू भगिनींना तसेच मायबापांना विनंती ** *जळगांव प्रतिनिधी सागर सिरसाट* - 23/10/2024 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष. दिपकभाऊ निकाळजे आणि राष्ट्रीय महासचिव डॉ. मोहनलाल पाटील यांनी मुंबई मराठी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 100 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. 80 उमेदवारांची दुसरी यादी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. पक्ष संविधानाचे रक्षण, जातीची जनगणना, आरक्षण कोटा पूर्ण करणे, खाजगी क्षेत्रातील उद्योगांमध्ये आरक्षण, महागाई-बेरोजगारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या मुंबईत स्मारकाचे बांधकाम, मोफत शिक्षण व आरोग्य सुविधा, महिला आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेसारख्या मुद्द्यांवर पक्ष निवडणूक लढवणार आहे. पत्रकार परिषदेला बाळासाहेब पवार, कैलास जोगदंड, अशोक ससाणे, रमेश भोईर, तानाजी मिसळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातून रिपाई आंबेडकर पक्षाचे उमेदवार म्हणून पॅंथर प्रफुल तायडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.अल्पावधीतच पक्षात आपल्या नावाचा गवगवा, सक्षम कार्यानुभव म्हणून त्यांची ओळख आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. काही दिवसा अगोदर प्रफुल तायडे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. पॅंथर प्रफुल तायडे यांनी जळगाव मतदारसंघांमध्ये सामाजिक, आर्थिक,धार्मिक,सांस्कृतिक महत्त्वपूर्ण कामे तसेच शेकडो आंदोलनांमध्ये त्यांचा सहभाग उत्कृष्ट भूमिका घेत आपल्या कार्याचा गौरव समाजापर्यंत पोहोचवण्याचा काम त्यांनी केलेल आहे. होणारे आंदोलन व समाजकारण सामाजिक कार्यकर्ते म्हणून कर्तव्य पार पाडले. याचे फळ व त्यांच्या कामाचा आढावा लक्षात घेऊन वरिष्ठांनी ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे. येणाऱ्या 29 ऑक्टोबरला आपला उमेदवारीअर्ज भरण्यासाठी हजारो संख्येने या भव्य रॅलीमध्ये शामिल होऊन. माझे हात बळकट करा. अशी विनंती पँथर प्रफुल तायडे यांनी मतदार संघातील मतदारांना केली आहे. *चौकट (फोटो) पँथर प्रफुल तायडे* मोफत शिक्षण व आरोग्य सुविधा, महिला आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेसारख्या गरीब जनतेची सेवा तसेच तरुण पिढीला शैक्षणिक शिक्षण देऊन प्रगतशील करून समाजात त्यांचा जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करणार.तसेच वरिष्ठांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवली त्याबद्दल मी वरिष्ठांचे आभार मानतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर हा पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून तयार झालेला पक्ष आहे.कायम स्वाभिमानाने बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारांवर शासन कर्ती जमात बना असा संकल्प मनात ठाम ठेऊन विधानसभेच्या रिंगणात उतरलो आहे.शाहू,फुले,आंबेडकर यांची विचार समाजात पेरण्याचा तसेच समाजभिमुख कर्तव्य पार पडण्याचा निश्चय केलेला आहे. प्रतिनिधी,सागर सिरसाठ जळगाव जामोद ...... महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक गजानन धंदरे मो नंबर 9850835306
Popular posts from this blog