Skip to main content
बेकिंग...... माय भुमि न्युज जिल्हा प्रतिनिधी, विश्वनाथ झाडे चंद्रपूर *📍कृ.उ.बा.स. परीसर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक परीसर राजुरा.*भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून आज राजुरा तहसील कार्यालयात नामांकन अर्ज दाखल केले. त्यानिमित्तानं शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परीसरापासून हजारोंच्या संख्येत निघालेल्या नामांकन रॅलीत सहभागी होत विधानसभेच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मायबाप जनतेचा आशिर्वाद घेतला.राजुरा विधानसभेच्या विकासासाठी आपल्या सर्वांच्या साथीने पुढचं पाऊल टाकतांना गावखेड्यातल्या माझ्या कार्यकर्त्यांकडून, सामान्य मतदार बांधवांकडून आणि विशेष म्हणजे माझ्या लाडक्या बहिणी व युवा मित्रांकडून आज मिळालेला उदंड प्रतिसाद व निस्पृह प्रेम हाच महायुतीच्या विजयाची नांदी ठरेल. खरंतर आज राजुरा शहरातून ऐतिहासिक रॅली निघाली; ही रेकार्डब्रेक रॅली म्हणजे विधानसभेच्या विकासाचा शंखनाद आहे. विकासाला कोणत्याही मर्यादा नसतात. विकास हीच माझी जात, विकास हाच माझा धर्म आणि विकास हाच माझा पक्ष आहे. मतदारसंघातील जनता महायुती सरकारच्या पाठीशी आहे. मतदार मायबापांना यंदा बदल अपेक्षित असून त्यासाठी जनता विकासाला प्राधान्य देईल असा मला विश्वास आहे. असे प्रतिपादन नामांकन रॅलीच्या सांगतेवेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक परीसरातील संबोधनात केले. यावेळी संकल्परथावर माझ्यासमवेत शिवसेना जिल्हाप्रमुख बंडू हजारे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, तालुकाध्यक्ष संतोष देरकर सर्व मंडळ अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी, जेष्ठ श्रेष्ठ-नेते आदिंसह भाजपा व महायुती घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👆👆👆👆👆👆👆👆👆जिल्हा प्रतिनिधी, विश्वनाथ झाडे चंद्रपूर मो नंबर 7620575127🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog