Skip to main content
पोलिस स्टेशन हिवरखेड .... बेकिंग.... माय भुमि न्युज वर हद्दीतील ग्राम गणेशपूर येथिल राहणारे व PHS अमडापूर येथील दवाखान्यात क्लार्क म्हणून काम करणारे नंदू श्रीराम धंदरे वय 42 वर्ष हे दि. 18.10.2022 रोजी अचानक मिसिंग झाले म्हणून त्यांची पत्नी सविता नंदू धंदरे यांनी हिवरखेड पोलीस स्टेशन ला तक्रार दिली. सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार चौधरी साहेब यांचे मार्गदर्शना खाली गणेशपूर चे बिट इन्चार्ज पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल चव्हाण व त्यांचे सहकारी ना. पो. काँ प्रवीण जाधव हे करीत होते. त्यांना नंदू धंदरे यांचा अनैतिक संबंधा तून घातपात झाल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली त्यावरून त्यांनी त्या दिशेने तपास करून दीपक शालिकराम ढोके वय 23 वर्ष रा. गणेशपूर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचा मित्र अतुल गंगाराम कोकरे वय 28 वर्ष रा. गणेशपूर याने त्याचे नंदू धंदरे याचा मयत लहान भाऊ प्रकाश श्रीराम धंदरे याच्या विधवा पत्नी सोबत असलेल्या अनैतिक संबंधातून त्याचा अडथळा दूर करण्यासाठी त्याचा खून करून दिपक ढोके याचे मदतीने त्याचे प्रेत गणेशपूर उंद्री रोडला लागून असलेल्या त्याचे शेताचे धुऱ्यावर पुरले आहे असी कबुली दिल्याव रून. सदर ची माहिती ठाणेदार चौधरी सा यांनी वरिष्ठाना दिली. व गुन्ह्यातील दोन्ही आरोपीना अटक करून SDPO श्री ठाकरे साहेब,कार्यकारी दांडाधिकारी श्री जाधव साहेब गणेशपूर PHCयेथील पागोरे साहेब व इतर पोलीस व गावातील नागरिक यांचे उपस्थितीत आरोपीनी दाखविलेल्या घटनास्थळी खोदकाम केले असता मृतक नंदू श्रीराम धंदरे याचा हाडाचा सापळा मिळून आला वरून हिवरखेड पोलिसांनी आरोपीनविरुद्ध अपराध तर नंबर 216/24 कलम 302,201,34 भारतीय दंड संहिता प्रमाणे गुन्हा नोंद केला असून पुढील तपास वरिष्ठाचे मार्गदर्शनखाली ठाणेदार चौधरी सा हे करीत आहेत महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306भाग एक 👆👆👆👆👆👆👆👆👆🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog