Skip to main content
जागतीक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हाधिकारी यांच्याकडून हिरवी झेंडी दाखवून भव्य रॅली,....ब्रेकिंग.... माय भुमि न्युज वर पहा थेट रहा अपटेड आपली भाषा सडेतोड भाषा माय भुमि न्युज अकोला:- महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी व दिव्यांग कर्मचारी संघटना अकोला यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे ३ डीसेंबर २०२४ ला संघटनेचे कार्यालय मुख्य पोष्ट ऑफिस जवळ अकोला येथे भव्य जागतीक अपंग दिनाचे आयोजन करून अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी हिरवी झेंडी दाखवून भव्य रॅली प्रारंभ करण्यात आला आहे. या रॅली ला सकाळी ११ वाजता दिव्यांगांची भव्य रॅली काढून दुपारी १२ वाजता गुणवंत दिव्यांग विद्यार्थी , खेळाडू, कर्मचारी पाल्य यांचा गुणगौरव तर उपस्थित सन्माननिय पदाधिकारी व अधिकारी यांचे मार्गदर्शन करण्यात आले. दुपारी २ वाजता भोजनानंतर दिव्यांग वधूवर परिचय मेळावा तर त्यानंतर न्यायाधीश पैठणकर यांचे मार्गदर्शन लाभले.त्यानंतर नेरकर यांनी चादर,साडी कपडे आदी दिव्यांग ना वाटप करण्यात आले.त्यानंतर सायंकाळी ५वाजता कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संजय बरडे यांचे अध्यक्षते खाली जागतिक अपंगदिन कार्यक्रमांत अकोला जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी मा अजीत कुंभार (भाप्रसे ) मा योगेश पैठणकर सचिव जिल्हा विधी सेवा प्राधीकरण अकोला , मा हरिनारायसिंह परिहार समाज कल्याण अधिकारी, मा . साजिद खान पठाण आमदार अकोला पश्चिम यांचे उपस्थिती मध्ये होणार असून सदर कार्यक्रमांस जिल्ह्या तील दिव्यांग बांधवांनी मोठ्यां संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीचे संजय बरडे राज्य उपाध्यक्ष , मो अ अजिज जिल्हा सचिव व दिलीप सरदार जिल्हा कोषाध्यक्ष अकोला यांनी केले आहे...... महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा... मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306, प्रतिनिधी, राजेश अवचार पातूर अकोला
Popular posts from this blog