Skip to main content
श्रीमंती राधाबाई बकाल विद्यालय लोहारा,येथील विद्यार्थांना ठाणेदार श्री गोपाल ढोले साहेब यांनी केले मार्गदर्शन ...ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर न्यूज प्रतिनिधी/राजेश दामोदर बाळापूर:- बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील श्रीमंती राधाबाई बकाल विद्यालय येथील विद्यार्थांना ठाणेदार गोपाल ढोले यांनी केले मार्गदर्शन. श्रीमती राधाबाई बकाल विद्यालय लोहारा येथे उरळ पोलीस स्टेशन चे कर्तव्य दक्ष ठाणेदार श्री. गोपाल ढोले साहेब यांनी भेट दिली.सर्वप्रथम विद्यालयाचे वतीने मुख्याध्यापक श्री विलास मिरगे सर यांनी त्यांचे स्वागत केले तसेच त्यांचे . दुबे साहेब ,बैस मेजर यांचे स्वागत .भोंडने सर व राठोड सर यांनी केले. विद्यार्थ्यांना कायदा ,सुरक्षितता,रस्ते अपघात व हेल्मेट वापर यावर मार्गदर्शन केले. तसेच मुलींची सुरक्षितता व घ्यावयाची काळजी आणि मोबाईलचा वापर व त्यावरून होणारी फसवणूक व गैरवापर याबद्दल माहिती दिली.विद्यार्थी यांनी अभ्यास करून आपले करिअर प्रथम घडवावे व आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करावे असे आव्हान केले. ठाणेदार साहेब यांनी मुलींना पोलीस हेल्प लाईन नंबर व मुलींना काही अडचण असल्यास शिक्षक व दामीनी पथक यांना माहिती द्यावी असे सांगितले.कार्यक्रमाला उपस्थित म्हणून श्री.अनिल बकाल शाळा समिती अध्यक्ष व श्री.शरद बकाल पोलीस पाटील तसेच श्री.प्रवीण मोरे सरपंच.. संतोष मोरे, श्रीकृष्ण पवार होते. तसेच कार्यक्रमासाठी श्री. भोंडने सर,राठोड सर,कुकडे सर,विंचन कर सर, यांनी सहकार्य केले.महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306प्रतिनिधी..... राजेश दामोदर बाळापूर अकोला 👆👆👆👆👆👆👆👆👆🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog