Skip to main content
भोयगाव मार्गावर बस बोंबाबोंब कायमचब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर राज्य परिवहन महामंडळाचा अजब कारभार ; प्रवाशांची गैरसोयकोरपना तालुका प्रतिनिधी Dinesh bode ... Korapana... Chandrapur चंद्रपूर ते कोरपना मार्गे भोयगाव ही बस फेरी अद्यापही पूर्ववत सुरू करण्यात आली नाही. परिणामी या मार्गावर बसबाबतची अडचण अजूनही कायमच आहे. परंतु याकडे लक्ष द्यायला राज्य परिवहन महामंडळाकडे लक्षच नसल्याचे दिसून येते.जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या चंद्रपूर व तालुक्याचे मुख्यालय असलेल्या कोरपना येथे जाण्या व येण्याकरता परिसरातील कोरपना , धोपटाळा,माथा , कुसळ, लोणी , वनसडी, शिवनारंडा , नारंडा , बोरी नवेगाव, वनोजा, चीच नवेगाव , कढोली , अंतरगाव , सांगोडा हिरापूर, कारवाई , सोनुर्ली , गाडेगाव , विरुर, इरई, कवठाळा,एकोडी , भोयगाव, भारोसा, धानोरा , पिंपरी , वेंडली , मारडा , देवाडा , दाताळा , चंद्रपूर या ३१ हून अधिक गावासाठी ही बस फेरी महत्वपूर्ण आहे. परंतु बस संपापासून ही बस फेरी कायमची बंद आहे. विशेष म्हणजे या मार्गावरील पुल व रस्त्याचे काम सुरू असल्याने ही बस फेरी पूर्ववत सुरू करण्यास राज्य परिवहन महामंडळ असमर्थता दर्शवत होते. परंतु आता तेही काम पूर्णत्वास आले आहे. रस्ताही गुळगुळीत झाला आहे. मात्र बस फेरी सुरू करण्यात आली नाही. याबाबत एका आढावा बैठक मध्ये सुद्धा बस सुरू करण्याविषयी सूचना करण्यात आल्या होत्या. परंतु त्याला सुद्धा केराची टोपली दाखवण्यात येत आहे. परिणामी या परिसरातील ग्रामस्थांना या मार्गावर खाजगी वाहने उपलब्ध नसल्याने स्वतःच्याच वाहनानेच प्रवास करावा लागतो आहे. यामुळे आर्थिक भुर्दंड व वेळेचा ही फटका बसतोय आहे.विद्यार्थी, कर्मचारी ग्रामस्थांची अडचण चंद्रपूर कोरपना ही थेट बस फेरी बंद आहे. यामुळे विरुर कोळसा खाण, दालमिया सिमेंट उद्योग, जिनिंग प्रेसिंग कारखाने, विविध शाळा महाविद्यालय येथे कार्यरत कर्मचारी , विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना जाण्या येण्या साठी मोठी अडचण निर्माण होत आहे. विशेष म्हणजे हा एस टी उत्पन्न देणारा मार्ग असून ही या मार्गावर बस का बरं सुरू केली जात नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहेमहाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306प्रतिनिधी.... दिनेश बोंडे कोरपना चंद्रपूर 👆👆👆👆👆👆👆👆👆🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog