Skip to main content
*विश्व हिंदू परिषद- बजरंग दल श्रीराम जन्मोत्सव समिती ,खामगाव कडून श्रीराम जन्मोत्सवाचे मंडप पूजन* ●ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर 👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾खामगाव- दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुध्दा श्रीराम जन्मोत्सव चैत्र शुध्द प्रतिपदा रविवार ते चैत्र शु. नवमी रविवार शके 1947 (दि. 30मार्च ते 6 एप्रिल 2025) या दरम्यान साजरा करण्यात येत आहे.अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम नवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे त्यानिमित्त फाल्गुन कृ. नवमी रविवार शके 1947 दि.23 मार्च 2025 या शुभदिनी सकाळी दहा वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अयोध्या धाम महाराणा प्रताप उद्यान, टॉवर चौक येथे प्रभू श्रीराम मंडपाचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी मध्ये विहिंप विदर्भ प्रांत उपाध्यक्ष, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे वैज्ञानिक सल्लागार, तज्ञ् शास्त्रज्ञ् तथा संशोधक डॉ हेमंतजी जांभेकर तसेच जेष्ठ पत्रकार दै. देशोन्नती चे आवृत्ती संपादक, खामगाव रत्न राजेशजी राजोरे तसेचमुक्तेश्वर आश्रमाचे अध्यक्ष माधवजी जोशीयांच्या उपस्थितीत ब्रह्म वृंदांच्या मंत्रोच्चारात विधिवत मंडप पूजन करण्यात आले. यावेळी श्रीराम जन्मोत्सव समिती चे अध्यक्ष डॉक्टर भगतसिंहजी राजपूत, पूर्व अध्यक्ष दामोदरजी पांडे, सचिव अमोलजी अंधारे,विहिंप खामगाव जिल्हाध्यक्ष राजेशजी झापर्डे तसेच उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य, विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते नगरातील हिंदुत्ववादी नागरिक, खामगाव नगरातील समाजबांधव नागरिक बंधू भगिनीं उपस्थित होत्या.अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख श्रीकांत भुसारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.*चौकट*यावेळी इजरायल येथून भारत भेटीदरम्यान डॉ चव्हाण यांच्या कडे पाहुण्या म्हणून आलेल्या आयरिस कनान या सुद्धा विशेष उपस्थित होत्या. यावेळी केले गेलेले धार्मिक विधी, पूजन बघून त्या भारावून गेल्या होत्या. यावेळी त्यांनी मनाला विशेष आंनद झाल्याचे सांगितलेमहाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾माय भुमि न्युज चा ... ग्राउंड रिपोर्ट ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
Popular posts from this blog