Skip to main content
*दादा शेतकऱ्यांसाठी सुद्धा बँकांना सांगा पैशाचं सोंग करता येत नाही - कैलास फाटे*ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर *उपमुख्यमंत्री पवार यांनी लाडक्या बहिणींना केलेल्या विधानाप्रमाणे*खामगाव ( ) : महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशनात राज्याचे अर्थ मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बानींना शांत करण्यासाठी विधान भवनात सर्व सोंगं करता येतात पैशाचे सोंग करता येत नाही असे विधान केले. सरकारकडे आश्वासनाप्रमाणे लाडक्या बहिणींना 2100/- देण्यासाठी पैसा नाही त्या प्रमाणेच शेतकऱ्यांकडे सुध्दा बँकांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कर्ज भरण्यासाठी पैसा नाही आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं, तर त्या शेतकऱ्यांसाठी जरा बँकांना सांगा की शेतकऱ्यांकडे पैसा आला की तो भरेलच थोडं थांबा, सर्व सोंगं करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही त्यामुळे त्यांना कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नका, त्यांच्यावर कोर्टात केसेस करू नका असे सत्याग्रह शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कैलास फाटे यांनी प्रसिद्धी पत्रकातून खुले पत्र देऊन अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांना म्हटले आहे. पुढे ते म्हणाले की आज लाडक्या बहिणी पेक्ष्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या मागे बँका लागल्या आहेत त्यांच्यावर कोर्ट केसेस सुध्दा करत आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढतच आहेत, त्यांना वाचवणे गरजेचे आहे. शेतकरी मेला की त्याचं संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडतं. लाडक्या बहिणीला आश्वासनाप्रमाणे वाढीव रक्कम दिली नाही तर एकही लाडकी बहीण आत्महत्या करणार नाही आणि तरीही आनंदाने आपल्याला राखी बांधायला व भाऊबीजेला ओवाळायला येईल, मात्र जगाचा पोशिंदा शेतकरी गेला तर त्याच लाडक्या बहिणीच्या डोक्यावरचं कुंकू मिटून जाईल दादा आणि त्याच लाडक्या बहिणींचे मुलं पुढील आयुष्यात जिवंतपणी मरणयातना भोगत राहतील त्यांना वाचवणे गरजेचे आहे असे विदारक काळजाला भेदणारे वाक्य कैलास फाटे यांनी लिहिले आहे. या परिस्थितीवर एकच उपाय आहे तो म्हणजे शेतकऱ्यांची विना अट संपूर्ण कर्जमुक्ती आणि ती शासनाला देने शक्य आहे फक्त शासन शेतकऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांना खोटे आश्वासन देत आहे असा आरोप करत शेतकऱ्यांनी मृत्यूचे द्वार जवळ येण्याच्या आत आपल्या मुलांच्या हातात स्वतंत्र देण्यासाठी हक्काची लढाई करावी लागेल मग तो आपल्या समोर आपला पक्ष असो, नेता असो वा नातेवाईक असो असे आवाहन कैलास फाटे यांनी केलेमहाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾धन्यवाद
Popular posts from this blog