Skip to main content
पातूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या प्रवर्गनिहाय आरक्षणाची सोडत जाहीरबेकिंग....... माय भुमि न्युज वर पातूर तालुका प्रतिनिधी –प्रल्हाद गवई पातूर तहसील कार्यालयात नुकतीच ग्रामपंचायत सरपंचपदासाठी प्रवर्गनिहाय आरक्षण सोडतीची सभा पार पडली. या सभेत तालुक्यातील एकूण ५७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये २८ ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्गासाठी, तर २९ ग्रामपंचायती महिला आरक्षित म्हणून निश्चित करण्यात आल्या.सोडतीमध्ये निश्चित झालेले प्रवर्गनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे आहे:अनुसूचित जाती (SC):राहेर, खामखेड, पांगर ताटी, सावरगाव अंधार सांगवी, चागेफळ अनुसूचित जाती स्त्री (SC - महिला):माळराजुरा, खेट्री तांदळी, नवेगाव, कोठारी बुद्रुक, सायवनीअनुसूचित जमाती (ST):दिग्रस खुर्द, चरणगाव, विवरा, सुकळीअनुसूचित जमाती स्त्री (ST - महिला):आलेगाव २७, भंडारा, मलकापूरइतर मागासवर्ग (OBC):पाटील आंबाशी, आसोला, आष्टीइतर मागासवर्ग स्त्री (OBC - महिला):बोळखा, देऊळगाव शिरला, सस्तीसर्वसाधारण (OPEN):दिग्रस बुजुर्ग, खानापूर, भंडारद, बुजरूक, सांगोळा, पिंपळखुटा, पिंपरडोली, कोसगाव, पाडशिंगी, नांदखेड, जाम, जरंडी, शेकापूर, गोंधळवाडी, चोंडीसर्वसाधारण स्त्री (OPEN - महिला):चांदणी, बेलुरा खुर्द, पांडुरना, वहाळा बुद्रुक, तुलंगा बुद्रुक, मळसूर, बेलोरा बुद्रुक, उमरा, आगीखेड, तुलंगा खुर्द, तांदळी खुर्द, सावरखेड, कारला, बाभूळगावया सोडती प्रक्रियेसाठी आयोजित सभेला पातूरचे तहसीलदार डॉ. राहुल वानखडे, नायब तहसीलदार (निवडणूक) अजय तेलगोटे, अनिल वानखडे, तसेच दीपक पाचपोर पाटील आणि इतर संबंधित अधिकारी व ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही सोडत प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.या आरक्षणाच्या आधारे पुढील ग्रामपंचायत निवडणुकांच्या तयारीसाठी ग्रामस्थ आणि इच्छुक उमेदवार सज्ज होऊ लागले आहेत. तालुक्यातील राजकीय वातावरण आता निवडणूक रंग घेण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक.... गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306प्रतिनिधी..... प्रल्हाद गवई पातूर अकोला 👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾धन्यवाद
Popular posts from this blog