Skip to main content
जिजामाता महाविद्यालयात ज्ञान स्रोत केंद्र ब्रेकिंग......माय भुमि न्युज....विभागातर्फे ....पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती निमित्त पंधरवाडा साजरा बुलढाणा :- येथील जिजामाता महाविद्यालयाच्या ज्ञान स्त्रोत केंद्र विभागातर्फे राष्ट्रीय ग्रंथपाल दिन आणि भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या जयंतीचा पंधरवडा साजरा करण्यात आला. ज्यामध्ये भव्य ग्रंथ प्रदर्शनी, डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या जीवनावर आधारित लघु चित्रफीत तसेच सन्माननीय व्यक्तींचे मार्गदर्शनाचे नियोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या पुतळ्याचे पूजन करून व डॉ.एस.आर.रंगनाथन तसेच स्व.डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश गवई यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले तर प्रमुख वक्त्या म्हणून सौ.मेघा बाहेकर मॅडम, जिल्हा तुरुंगाधिकारी बुलढाणा व प्रा.डॉ.सौ.वंदना काकडे मॅडम (से.नि.) विभाग प्रमुख प्राणीशास्त्र विभाग, जिजामाता महाविद्यालय, बुलढाणा ह्या लाभल्या तसेच विशेष उपस्थिती म्हणून IQAC विभागाचे समन्वयक प्रा.डॉ.सुबोध चिंचोले होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे महाविद्यालय व ग्रंथालय विभागाच्या वतीने पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत करण्यात आले. प्रमुख वक्त्या म्हणून लाभलेल्या सौ.मेघा बाहेकर, जिल्हा तुरुंग अधिकारी,बुलढाणा यांनी आपल्या जीवनाचे प्रेरणादायी प्रसंग व्यक्त केले व संपूर्ण श्रोत्यांना आपल्या अमृततुल्य मार्गदर्शनाचे बाळकडू पाजले व तुरुंग व्यवस्थेबद्दल माहिती दिली तसेच आधुनिक तंत्रज्ञानासोबत पारंपारिक वाचनाचे महत्त्व पटवून दिले. तसेच दुसऱ्या प्रमुख वक्त्या म्हणून लाभलेल्या प्रा.डॉ.सौ. वंदना काकडे (से.नि.) यांनी सुद्धा ग्रंथालयाचे जीवनातील महत्त्व यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे IQAC विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. सुबोध चिंचोली सर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविणारे मा.प्रो.डॉ. सुरेश गवई यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन करून अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. दर्शना देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.अंकुश देठे ( ग्रंथपाल ) यांनी केले. कार्यक्रम उत्तमरीत्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे कर्मचारी मा.श्री. दिलीप मोरे, श्री अभिषेक अंजनकर, व कु. रीना मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले. कृपया आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्धी देऊन उपकृत करावे ही नम्र विनंती.... महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा... मुख्य संपादक मो नंबर 9850835306
Popular posts from this blog