Skip to main content
ब्रेकिंग.....माय भुमि न्युज वर 👍👍👍👍👍👍👍👍👍अखेर ग्रामसभेत विकास कामांना ....मंजुरीमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने कामांना लवकरच सुरुवातखामगाव:-टेंभुर्णा गावातील विविध विकास कामांना वेळोवेळी काही सदस्यांकडून आडवणूक होत असल्याने रखडलेली कामे अखेर ग्रामसभेत मंजूर झाली आहेत. दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता टेंभुर्णा ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत गावाच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित तब्बल १५ महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली.या ग्रामसभेचे अध्यक्षस्थान सरपंच भारती श्रीकृष्ण मोरे यांनी भूषविले. विस्तार अधिकारी दिलीप घुगे, व ग्रामपंचायत अधिकारी गजानन सोळंके यांच्या उपस्थितीत ग्रामसभा शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार मंजूर विकास कामांना लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.ग्रामसभेत विकसित भारत रोजगार हमी व उपजीविका मिशन (ग्रामीण) योजनांची जनजागृती करणे, १५व्या वित्त आयोग निधीतील विकास कामांची निवड करून ती तातडीने सुरू करणे, दक्षता समितीची निवड, तसेच सामान्य निधीतील विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली.याशिवाय बौद्ध स्मशानभूमी जवळील हॉल/खोलीत सामान्य निधी किंवा लोकवर्गणीतून ग्रंथालय सुरू करणे, खासदार व आमदार निधी तसेच इतर निधीतून गट नं. ४४७ ई क्लास जागेवर मेडिटेशन सेंटर हॉल/सभागृह बांधकामास नाहरकत देणे, गावठाण व वाढीव गावठाणातील अतिक्रमणधारकांच्या जागा नियमाकूल करून त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.गावाच्या सौंदर्यीकरणासाठी प्रमुख प्रवेश मार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले, अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे व बिरसा मुंडा यांच्या नावाने प्रवेशद्वार उभारण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या व टंचाई निवारण, पाणीपुरवठा, स्वच्छता व आरोग्य बांधकाम समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत मातंग समाजासाठी फॅब्रिकेशन सभामंडप, मुस्लिम समाजासाठी कब्रस्तान बांधकाम, छत्रपती शिवाजी महाराज चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सौंदर्यीकरण, तसेच हिंदू स्मशानभूमीच्या बांधकामालाही ग्रामसभेत मंजुरी देण्यात आली.अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विकास विषयांना अखेर मंजुरी मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत असून, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार कामांना तातडीने सुरुवात होणार असल्याने गावाच्या विकासाला गती मिळणार आहे....महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक.... गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👍👍👍👍👍👍👍👍👍धन्यवाद
Popular posts from this blog